सध्या भारतात जॉब मार्केट वेगाने बदलत आहे. नवीन जॉब च्या संख्या कमी झाल्या आहेत. सगळ्यात जास्त नवीन जॉब देणाऱ्या आयटी क्षेत्रात तर अनेक लोकांना जॉब वरून कमी करण्यात येतंय, तसेच नवीन जॉब सुद्धा खूप कमी झाले आहेत. गेल्या काही वर्षात हजारोंच्या संख्येने लोकांना कामावरून काढून टाकले जात आहे. या अश्या जॉब मार्केट मधल्या अस्थिरतेमुळे नोकरदार वर्गाला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आता बरेच लोक चांगल्या रोजगाराच्या संधींकरता इंटरनेट, जाहिरात होर्डिंग, वर्तमानपत्र, जॉब कन्सल्टन्सी, सोशल मिडिया अश्या बर्याच मार्गांनी नोकरी शोधत आहेत.
नोकरी शोधणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने, संधीचा फायदा घेणाऱ्या नोकरी देणाऱ्या संस्था देखील खूप वाढत आहे. फॅन्सी जाहिराती देऊन अनेक जॉब रिक्रूटिंग कन्सल्टन्सी उच्च वेतन आणि बर्याच फायद्यांसह नोकरीचे आश्वासन देतात. अश्या जाहिराती पाहून लोक जेव्हा त्यांच्याशी संपर्क साधतात, तेव्हा बऱ्याच कन्सल्टन्सी त्यांच्याकडून रेजिस्टेशन फी, व्हिसा अथवा मेडिकल प्रोसेसिंग फी, वन टाईम चार्जेस, इंटरव्हिएव राऊंड क्लिअर करण्यासाठी चार्जेस, कमिशन अश्या अनेक नावांखाली लूटमार करतांना दिसून येते. पण सगळ्याच जॉब रिक्रूटिंग कन्सल्टन्सी फेक नाहियेत, काही कन्सल्टन्सी पारदर्शक आणि नैतीक पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या आहेत. मग अश्यावेळी आपण फसवले न जाता फेक कन्सल्टन्सी कश्या ओळखायच्या?
- जर तुम्हाला नोकरी बद्दल कोणतीही ठोस माहिती न देता, ऑफिस ला इंटरव्हियुला येण्यासाठी वारंवार विनंती केली जात असेल तर आधीच सावध व्हा. तुम्ही फसवले जाऊ शकता.
- जर तुम्हाला कोणतीही ठोस माहिती न देता, रेजिस्ट्रेशन फी साठी विचारणा केली जात असेल तर कन्सल्टन्सी च्या विश्वासाहर्तेपणावर नक्कीच संशय येतो.
- ज्यावेळी तुम्ही जॉब साठी निवेदन करता त्या वेळी तुम्हाला जॉब ची संपूर्ण माहिती दिली जाते. यात जॉब पोसिशन, शैक्षणिक व अनुभव पात्रता, पगार, कंपनी चे नाव, कामाची वेळ अश्या अनेक गोष्टी असतात. जर तुमच्यापासून ही माहिती लपवली जात असेल, तर निश्चितपणे कन्सल्टन्सी बनावट आहे हे समजून घ्यावे.
- जॉब साठी एखाद्या रिक्रूटर कडून जाहिरात, ईमेल, एसमएस येतात तेव्हा त्यात कन्सल्टन्सी / कंपनी चे नाव दिले असते. प्रत्येक चांगल्या कन्सल्टन्सी / कंपनी ची स्वतःची एक वेबसाइट असते. वेबसाइट वर त्यांचा ईमेल, पत्ता, संपर्क क्रमांक, कंपनी व टीम ची माहिती इ. असते. तसेच काही वेबसाइट वर अश्या कन्सल्टन्सी / कंपनी चा रिव्हियू, त्यांच्या माध्यमातून नोकरी भेटलेल्या लोकांचे अनुभव, फेक आहेत का याची माहिती असते. त्यामुळे कोणत्याही रिक्रूटर कडे जाण्याआधी त्यांची माहिती Google वर शोधा व उलट तपासणी करा. जर काही गोष्टी जुळत नसतील तर ऑफरबद्दल पुन्हा विचार करा.
- सर्व नामांकित कन्सल्टन्सी चे कॉर्पोरेट ई-मेल खाते असते. जर कोणत्याही कन्सल्टन्सीने तुम्हाला याहू, जि-मेल, लाइव्ह किंवा हॉटमेल सारख्या मोफत ई-मेल अकाऊंट वरून ई-मेल केले असेल तर ती बनावट कन्सल्टन्सी असण्याची दाट शक्यता आहे.
- लक्षात ठेवा कोणतीही कंपनी पहिली मुलाखत घेतल्याशिवाय तुम्हाला जॉब देत नाही, अगदी बाहेर देशातील कंपनी असेल तरी सुद्धा. बऱ्याच जणांना असे वाटते की कन्सल्टन्सी चं टाय-अप असल्यामुळे कंपनीने फक्त आपला रेझ्युम वरून, आपल्याला न भेटता डायरेक्ट सिलेक्ट केले आणि जॉब ऑफर लेटर दिले. पण प्रत्यक्षात असे काहीच नसते. त्यामुळे “आमची सेटिंग आहे”, “आम्ही मॅनेज करतो”, “आम्हाला डायरेक्ट रिक्रूट करायला परवाणगी आहे” या सगळ्या भूल थापा आहेत. जर तुम्हाला फोन व ई-मेलद्वारे संपर्क करून जर नोकरीची ऑफर आली असेल तर लगेच स्वीकारू नका अथवा पैसे देऊ नका. पूर्णपणे माहिती घ्या व फसवणूक होण्यापासून आपला बचाव करा.
आपल्यातील अनेक जणांचे असे ठाम मत असते कि, पैसे दिल्याशिवाय काहीच होत नाही. पण हा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे, याच गोष्टीचा फायदा घेऊन अनेक फेक कन्सल्टन्सी आज कार्यरत आहेत आणि तुमचा (अथवा पालकांचा) कष्टाचा पैसा आपल्या खिशात घालत आहेत. आपल्या अनेकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी व आपल्याला शिक्षण, नोकरी संदर्भात योग्य मार्गदर्शन करता यावे म्हणून आम्ही एक फेसबुक ग्रुप तय्यार केला आहे. ह्या ग्रुप ला कनेक्ट होण्यासाठी क्लिक करा स्मार्टएलिक्स नोकरी मार्गदर्शक (Smartelix Job Mentors).
वरील माहिती आपणांस उपयोगी वाटली का? अजून काही उपयोगी माहिती किंवा आमच्यासाठी काही सूचना असतील तर आम्हाला खाली कॉमेंट करून कळवा.