भारतात आपण जी काही कमाई करतो, त्यावर काही टक्के रक्कम ही इनकम टॅक्स (आय. टी.) च्या माध्यमातून सरकारला द्यावी लागते. त्यासाठी आपल्याला प्रत्येक आर्थिक वर्ष संपल्यानंतर इनकम टॅक्स (आय. टी.) रिटर्न च्या माध्यमातून आपला इनकम, झालेला खर्च, शिल्लक व त्यावर लागलेला टॅक्स अशी माहिती सरकारला द्यावी लागते. आज आपल्या देशात फक्त ४-५% लोकच टॅक्स भरतात. आय.टी. रिटर्न म्हणजे नक्की काय हे बऱ्याच लोकांना माहिती सुद्धा नाही. अनेक लोकांचा असा समाज आहे की, मी टॅक्स भरत असेल तरच इनकम टॅक्स रिटर्न भरणे करणे अवश्य आहे. पण तसं नाहीये. आय.टी. रिटर्न म्हणजे तुमच्या उत्पन्नाचा ताळेबंद असतो आणि त्याचा तुमच्या टॅक्स शी काहीच संबंध नाही. विशेषतः नवउद्योजकांना जरी इनकम टॅक्स भरणे आवश्यक नसले, तरी पण आय.टी. रिटर्न फाईल करणे अनेक दृष्ट्या फायदेशीर आहे. कसे ते पाहू:
व्यवसायिक कर्ज
तुम्ही ७-८ वर्ष एखादा व्यवसाय करत आहात आणि त्यातून तुम्हाला पुरेशी न करपात्र मिळकत सुद्धा आहे. आता तुम्हाला तो व्यवसाय वाढवायचा आहे आणि तुम्ही बँके कडे कर्ज मागता. अश्या वेळेस तुमचा इनकम किती आहे याचा अंदाज घेण्यासाठी, बँक तुम्हाला मागील तीन वर्षाचा आय.टी. रिटर्न मागते. पण जर तुम्ही करपात्र नसल्यामुळे आजपर्यंत कधीही आय.टी. रिटर्न फाईल केलेलाच नसेल, तर तुम्ही बँकेला तो देऊ शकत नाही. अश्यावेळेस इनकम प्रुफ (जो आय.टी. रिटर्न मध्ये द्यावा लागतो) नसल्यामुळे बँक तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्ज देण्यास मनाई करते. भांडवल नसल्यामुळे प्रगती खुंटते.
सरकारी योजना
सरकार व्यवसाय वाढवण्यासाठी अनेक कर्ज योजना काढत असतात. या योजना भांडवल उभं करायला व सोयिस्कर परतफेड करायला फायदेशीर असतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही खरंच किती उत्पन्न कमावतंय हे बँकेला अधिकृतरीत्या दाखविणे आवश्यक असते, तुमच्या तोंडी माहितीवर ते विश्वास ठेवत नाही. पण आय.टी. रिटर्न नसल्यामुळे उद्योजकांना कर्जाच्या प्राथमिक कागदपत्रांची पूर्तता करता येत नाही. त्यामुळे बँक सुद्धा अश्या उद्योजकांना कर्ज देत नाही आणि व्यवसायिक या योजनांचा फायदा घेऊ शकत नाही.
नवीन व्यवसायाची सुरुवात
जर तुम्ही व्यवसाय सुरू करण्याची योजना आखली असेल तर बँक तुम्हाला भांडवल उभं करण्यात मदत करू शकते. तुमची आर्थिक क्षमता पाहून बँक तुम्हाला नवीन व्यवसायासाठी कर्ज देते. तुम्ही जर आय.टी. रिटर्न भरत असाल तर, तुम्हाला १० लाखांपर्यंत कर्ज मंजूर होऊ शकते. पण जर तुमच्याकडे आय.टी. रिटर्न नसेल, तर बँक तुम्हाला जास्तीत जास्त ५० हजार कर्ज मंजूर करून देऊ शकते.
या अश्या व्यवसायातील कर्जाच्या सोयींमुळे आय.टी. रिटर्न भरणे खूप आवश्यक आहे. जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर आय.टी. रिटर्न फाईल करायला सुरुवात करा, अगदी तुमचं वय १८-१९ असलं तरी. मग तुमचं उत्पन्न करपात्र नसेल तरी निल (शून्य) रिटर्न फाईल करा. लक्षात ठेवा आय.टी. रिटर्न हा तुमच्या आर्थिक साक्षरतेचा आणि सक्षमतेचा पुरावा आहे. तो असेल तर तुम्हाला व्यवसायात भांडवल उभं करायला अडचणी येत नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, जर तुमचा अपघातामुळे मृत्यू झाला, तर तुमच्या आय.टी. रिटर्न चा आधारे सरकार तुमच्या कुटुंबियांना काही मोबदला देते.
वरील माहिती आपणांस उपयोगी वाटली का? अजून काही उपयोगी माहिती किंवा आमच्यासाठी काही सूचना असतील तर, आम्हाला खाली कॉमेंट करून कळवा.
मला आय टी रिटर्न माहिती नव्हती मला काढायचं आहे
Lavkar kadun ghya. Loan sathi khup madat hoti.
Tumchya olkhichya Tax Consultant kinva CA shi sampark kara.
आमाला पर्सनल फार्म कसा मिळेल
आपन सोता जर भरणे कशी करायचे
तुम्हाला आता एखाद्या CA किंवा टॅक्स कॉन्सलटन्ट ला भेटावे लागेल. ३० सप्टेंबर शेवट तारीख होती