आजच्या सोशल मिडिया जगात अनेक प्रोफेशनल लोकांना एकत्र अण्णारा प्लॅटफॉर्म म्हणजे लिंक्डइन (LinkedIn). लिंक्डइनचा वापर आपण प्रोफेशनल लोकांशी कनेक्ट होण्यासाठी, नोकरीसाठी, व्यवसाय वाढवण्यासाठी, मार्केटिंगसाठी व अश्या अनेक गोष्टींसाठी आपण करू शकतो. लिंक्डइन वापरून जर तुम्हाला आपले प्रोफेशनल नेटवर्क विकसित करायचे असेल तर, सर्वात पहिले तुमची एक प्रभावी प्रोफाईल बनवणे गरजेचे आहे. कारण लोक तुमचा अनुभव आणि कौशल्याबद्दल माहिती घेऊन, मग तुम्हाला त्यांच्या नेटवर्क मध्ये समाविष्ट करून घेतील.
त्यामुळे तुम्ही जेव्हा लिंक्डइन वर तुमची प्रोफाइल तयार करता, तेव्हा त्यात काय समाविष्ट करावे हे महत्वाचे आहे. अश्या ह्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म चा उपयोग आपण आपल्या प्रगती साठी कसा करू शकतो? थोडक्यात पाहुयात.
१. प्रोफाइल उत्कृष्ट बनविण्यासाठी वेळ द्या: साध्या शब्दात सांगायचे तर, तुमचे प्रोफाइल अधिक पूर्ण होईल, तुम्ही शोधले गेले तर प्रथम स्थानावर दिसाल ह्या दृष्टिकोनातून तुमची सगळी माहिती पूर्ण करणे महत्वाचे आहे. तुमचं पूर्ण प्रोफाइल तुमचे कौशल्य, अनुभव, कुठे-कुठे काम केले आहे, शैक्षणिक पात्रता अश्या अनेक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवू शकते. तसेच लोक तुमच्या विषयी काय विचार करतात हे जाणून घ्यायचे असेल तर, तुमच्या प्रोफाइलमधील कोणत्याही विभागात आळशीपणा आणून चालणार नाही. लिंक्डइन प्रत्यक्षात तुमच्या प्रोफाइलची”पूर्णपणाची” ची मोजणी करते, आणि ते कसे मजबूत करावे याबद्दल सूचना देत राहते.
२. चांगला फोटो निवडा: एक स्पष्ट, मैत्रीपूर्ण आणि योग्य व्यावसायिक प्रतिमा निवडा. तुमचे लक्ष्य असलेल्या कंपनी, औद्योगिक क्षेत्रातील किंवा व्यावसायिक पातळीवरील लोक काय परिधान करतात ते पहा, आणि त्याला अनुसरून एक फोटो काढून घ्या. फोटो वापरल्यामुळे तुमच्या प्रोफाइल मागचा चेहरा दिसतो, नेटवर्किंग मधे एक विश्वासहर्ता येते, तसेच नोकरी साठी नियोक्त्याचे लक्ष वेधून घेण्यास मदत होते. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा एखाद्या व्यक्तीशी संपर्क साधाल तेव्हा ते तुमच्या फोटोमुळे ओळखू शकतील. जेव्हा तुम्ही आधीपासूनच माहित असलेल्या एखाद्याशी कनेक्ट होण्यासाठी लिंक्डइन आमंत्रण पाठवाल, तेव्हा ते तुमचे आमंत्रण सहजपणे स्वीकारतील कारण ते तुमचा चेहरा ओळखतील. तुमच्या लिंक्डइन प्रोफाइलमध्ये चांगला फोटो अपलोड केल्याने तुम्हाला योग्य प्रोफाइल बनवण्यास मदत होईल आणि तुमचे प्रोफाइल पाहणार्या लोकांची संख्या वाढायला मदत होईल.
३. अर्थपूर्ण शीर्षक लिहा: तुम्ही नोकरी शोधत असल्यास, तुम्ही प्रोफाइल मधे जे शीर्षक (Headline) लिहणार आहात त्यात तुमचे नाव किंवा जॉब टायटल लिहणे टाळा. लिंक्डइन तुमचे शीर्षक तुमच्या वर्तमान जॉब शीर्षक आणि नियोक्तासह पॉप्युलेट करते.
४. सारांश जागा वाया घालवू नका: तुमचा सारांश सुमारे 3-5 लघु परिच्छेद लांब असावा, शक्यतो मध्यभागी, महत्वाचे पॉईंट दाखवण्यासाठी बुलेट फॉन्ट चा वापर करावा. त्यामुळे वाचकांना तुमच्यातील मुख्य कौशल्ये, पात्रता, कामाची आवड, शैक्षणिक माहिती सहज समजते.
५. वर्तमान नोकरी नोंद: जरी बेरोजगार असाल तरी वर्तमान नोकरी नोंद समाविष्ट करा, जसे कि जर तुम्ही विद्यार्थी असाल तर फुल टाइम विद्यार्थी, किंवा नोकरी शोधत असाल तर “नवीन संधी शोधण्यात” अशी माहिती समाविष्ट करू शकता.
६. लिंक्डइन संपर्क माहिती: तुमच्या लिंक्डइन संपर्क माहिती विभागात तुमचा ईमेल पत्ता (किंवा ब्लॉग, ट्विटर हँडल, किंवा इतर) टाकण्याचे विसरू नका. ह्याची खात्री करा कि लोक तुम्हाला ऑनलाईन शोधू व संपर्क करू शकतात.
लिंक्डइनवर चांगल्या प्रकारे नेटवर्किंग करायचे असेल तर खालील काही गोष्टी पण केल्या पाहिजेत:
७. तुमचा नोकरी शोध अंतर्गत ठेवा: तुम्ही जर एक नवीन नोकरी शोधत असाल आणि सक्रियपणे तुम्ही वर्तमान नोकरीत गुंतलेले असाल, तर तुमच्या ह्या शोधाची माहिती तुमच्या नियोक्त्याला होऊ नये अशीच इच्छा असेल. बर्याच लोकांना माहित नाही की लिंक्डइनमध्ये गोपनीयता सेटिंग्ज आहेत. ह्या वापराव्यात जेणेकरून तुमच्या बॉस ला वाटेल कि तुम्ही नवीन नोकरी शोधत नाही. गोपनीयता सेटिंग्ज शोधणे सोपे आहे. फक्त साइन इन करा, तुमचे नाव / फोटो वरच्या उजव्या कोपऱ्यात दिसेल, तिथून ड्रॉप-डाउन मेनूमधून सेटिंग्ज निवडा.
८. प्रोफेशनल ग्रुपस् ला कनेक्ट व्हा: लिंक्डइनवर नोकरीच्या संधी पोस्ट करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. तसेच अनेक ग्रुपमध्ये सुद्धा नोकरी विषयक माहिती शेर केली जाते. त्यामुळे नोकरी शोधणाऱ्या लोकांनी लिंक्डइन नेटवर्किंगवर विशेषत: लक्ष केंद्रित केले पाहिजे. प्रत्येक समूहाच्या मुख्य पेज वर शीर्षस्थानी असलेल्या “चर्चा” (Conversation) टॅबच्या पुढे “नोकरी” (Jobs) टॅब आहे; जिथे आपण पोस्ट केलेल्या नोकर्या शोधू शकता.
९. योग्य किवर्ड वापरा: लिंक्डइनवर लोक किवर्ड च्या आधारे माहिती / लोक शोधतात. त्यामुळे आपल्या प्रोफाइल मधे योग्य किवर्ड असणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणून प्रोफाइल बनवताना तुमच्यातील कौशल्य,अनुभव, शैक्षणिक पात्रता व इतर माहिती दाखवण्यासाठी वापरले जाणारे शब्द किंवा वाक्यांश खूप विचार करून निवडावे. तसे केल्यास तुमची प्रोफाइल सुलभपणे नियोक्त्यांना दिसेल आणि नोकरी च्या अनेक संधी चालून येतील. योग्य किवर्ड वापरून आपली प्रोफेशनल प्रोफाइल बनवण्यासाठी आमच्या JobReady™ प्रोग्राम मधे सहभाग घ्या.