जीवनात आपण यशस्वी व्हायला हवं, असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यासाठी आपण आपले तास, दिवस, वर्ष कसे घालवतो याचे नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच आपण वेळ फुकट घालवणार्या गोष्टी बंद केल्या पाहिजे. कोणत्या कामाला किती वेळ दिला पाहिजे, त्यानुसार कामांचे विभाजन करायला हवे. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर कोणत्या गोष्टी करू नये हे आपण पाहुयात:
१. सोशल मिडियाच्या जाळ्या मध्ये अडकू नका: सोशल मिडिया मध्ये अनेक वेबसाईट्स (व त्यांचे मोबाईल अँप) येतात. त्यामध्ये फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर, इन्स्टा ग्राम असे अनेक आहेत. अनेक लोक सोशल मीडिया वर तास न तास ऍक्टिव्ह असतात. तसेच ऑनलाइन गेम खेळणे अथवा चॅटिंग करण्यात पण अनेक जण गुंग असतात. ऑनलाईन किती वेळ घालवायचा हे जर तुम्ही ठरवले नसेल तर कधी मिनिटांचे तास आणि तासांचे दिवस होऊन जातील कळणारही नाही. या सोशल मिडियाच्या जगातून बाहेर पडायचे असेल, तर वेळेचे नियोजन करून वेळेची मर्यादा पाळणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सोशल मिडिया आज काळची गरज आहे हे जरी मान्य केलं, तरी पण यशस्वी होण्यासाठी त्याच्या आहारी जाऊ नका.
२. इतर लोकं काय करतात याचा विचार करून ध्येयापासून विचलित होऊ नका: इतर लोक काय करतात ह्याचा विचार तुम्ही करू नका कारण तुम्ही विचार करे पर्यंत ती व्यक्ती तुमच्या खूप पुढे निघून गेलेली असेल. जेव्हा तुम्ही दुसऱ्याशी तुलना करू लागता तेव्हा तुमच्या ध्येयाला उतरती कळा लागते. तुलना करायचीच असेल तर ती स्वतःशी करा दुसऱ्याशी नाही. तुमचे विचार बदला आणि इतरांकडून प्रेरित व्हा.
३. स्वत:ला प्राधान्य द्या: तुमची आवड निवड ओळखा, या यादीत तुमचा वेळ घालवणाऱ्या गोष्टी आहेत का? जर असतील, तर त्यांना तुमच्या आयुष्यातून हद्दपार करा आणि तुमच्या आयुष्याचा स्वत: ताबा घ्या. बऱ्याच वेळा कामामुळे पुरेशी झोप किंवा व्यायाम होत नाही. परिणामी तुम्हाला कंटाळा, आळस, निरस्ता येते. याच्या व्यतिरिक्त शारीरिक व्याधी किंवा आजारपण अनेकांना येऊ शकते. म्हणून यशासाठी तुम्हाला ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुम्ही स्वतः साठी वेळ काढला पाहिजे आणि स्वतः ला प्राधान्य दिले पाहिजे. ज्या गोष्टी केल्याने मन प्रसन्न राहते त्या आवर्जून करा. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या गोष्टींनी दिवसाची सुरुवात करता तेव्हा संपूर्ण दिवस तुम्ही आनंदी, उत्साहित आणि सुदृढ राहता.
४. भूतकाळातील चुकांसाठी रडत बसू नका: प्रेत्येकाच्या हातून दैनंदिन आयुष्यात काही ना काही चुका होतातं. ज्या चुका तुमच्या हातून झाल्यात त्या तुम्ही बदलू शकत नाही पण त्या तुम्हांला बरंच काही शिकवून जातात. त्यामुळे जेव्हा तुमच्याकडून काही चुकी होईल, तेव्हा त्या विचारांतून बाहेर पडा. यशस्वी होणे म्हणजे प्रत्येक चुकीतून अनुभव घेत राहणं, झालेल्या चुकांची पुनरावृत्ती न करणे व चुकांमधून घडत जाणे हेच होय.
५. हातात नसलेल्या गोष्टींचा विचार करत बसू नका: ज्या गोष्टीं तुमच्या हातात आहेत त्या गोष्टींमधून आपण काय करू शकतो ह्याचा नेहमी विचार करा आणि पुढे जात रहा. कुठल्याही गोष्टींची चिंता करत बसण्याने ते कार्य साध्य होत नाही. म्हणून हातात नसलेल्या गोष्टींचा जास्त विचार करत बसू नका. तुमचे विचार कृतीत उतरवा आणि प्रगती च्या दिशेने चालत रहा.
६. नकारात्मक लोकांची संगत सोडा: ज्या लोकांमध्ये तुमचा वावर आहे, त्यांच्या स्वभावांची सरासरी म्हणजे तुमचा स्वभाव असतो. तूम्ही नकारत्मक विचार,लोक आणि काम ह्या पासून दूर आहात ना ह्यची खात्री करून घ्या. जर तुम्हाला यशस्वी आणि सर्वोकृष्ट व्हायचे असेल तर कायम सकारत्मक विचार करणाऱ्यांच्या संगतीत राहा. नकारात्मक संगतीचे लोक तुम्हाला कधीच यशस्वी होऊ देणार नाही म्हणून अश्या लोकांची संगत आधी सोडा. तसेच तुम्हाला आयुष्यात उंच भरारी घ्यायची असेल तर तुमचे पाय खेचणार्या गोष्टींपासून सावध आणि शक्यतो दूर रहा.
७. कोणताच दिवस नियोजनाविना सुरू करू नका: दैनंदिन आयुष्यात रोज आपण काही कामं विसरतो किंवा उद्यावर ढकलतो. कित्येकदा हि कामं नंतर मोठ्या समस्येच्या रूपात समोर येतात आणि त्रासदायक ठरतात. यशाचं शिखर गाठायचं असेल तर प्रत्येक दिवसाची सुरवात नियोजन करू करा. उद्या काय कारायचे आहे, ह्याचे नियोजन झोपण्या पूर्वी करा. यामध्ये रोजची “To-Do-List” बनवली तर खूप फायदेशीर ठरेल. अशी लिस्ट लिहून दिवसाच्या कामाचे छोट्या छोट्या टप्यातं विभागणी करा आणि महत्त्वाच्या दोन-तीन कामांवर लक्ष केंद्रित करा. त्याने तुमची सगळी कामे होत जाऊन तुमची दिवसाची To-Do-List संपेल.
वरील माहिती आपणांस उपयोगी वाटली का? अजून काही उपयोगी माहिती किंवा आमच्यासाठी काही सूचना असतील तर, आम्हाला खाली कॉमेंट करून कळवा.