आजमितीस जगातील २१ टक्के इंटरनेट वापरकर्ते दहा वर्षांपासून एकच पासवर्ड वापरत आहेत. तर ४७ टक्के वापरकत्रे पाच वर्षांपासून एकच पासवर्ड वापरत आहेत. २०१४ मध्ये बहुतांश लोकांचा पासवर्ड हे १२३४५६, पासवर्ड असे सोपे होते.
यामुळे हॅकिंग प्रकार या काळात जास्त वाढले होते. तर बहुतांश लोक विविध ऑनलाइन लॉगइनसाठी एकच पासवर्ड वापरतात. यामुळे अनेकदा एक खाते हॅक झाले की त्या व्यक्तीची इतर खाती हॅक करणेही सोपी जातात. यामुळे प्रत्येक खात्याचा पासवर्ड हा वेगळा असणे केव्हाही उपयुक्त ठरते. याचबरोबर पासवर्ड ठेवताना जुना आधी दिलेल्या पासवर्डचा वापर करूच नये.
तसेच आपल्या नावातील आद्याक्षरे किंवा जन्म तारखेचा उल्लेख त्यात नसावा. सध्या हॅकर्स हे लांबलचक पासवर्डही सहजगत्या हॅक करू लागले आहेत. यामुळे याबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. या हल्लांना ते डिक्शनरी अटॅक्स असे म्हणतात. ही प्रक्रिया अवघ्या काही सेकंदात केली जाते. याचबरोबर की लाँगर अटॅक केला जातो. ज्यात आपल्या उपकरणामध्ये मालवेअर जातो. असे झाल्यावर वापरकर्त्यांच्या नकळत पासवर्ड हॅकपर्यंत जातो. यासाठी तुम्ही पासवर्ड व्यवस्थापन प्रणालीचा वापर करून विविध खात्यांसाठी विविध पासवर्डचे व्यवस्थापन करू शकता. सध्या गुगलने क्रोम या ब्राऊझरमध्ये ऑटोफिलचा पर्याय आणला आहे. हा पर्याय अँटिव्हायरसने सुरक्षित उपकरणामध्ये वापरू शकतो. यामुळे मोठे पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज पडत नाही. तज्ज्ञांच्या मतानुसार पासवर्ड म्हणून मोठय़ा म्हणी किंवा वाक्प्रचारांचा वापर करणे केव्हाही योग्य ठरते.
लेखक – सिद्धार्थ तापस