साध्यातली साधी गोष्टही तुम्ही सारखी विसरता? लोकांची नावं, कामांच्या यादीतील कामं, अभ्यासाच्या गोष्टी आणि अगदी काहीही. त्यामुळे तुमच्या कामावर आणि पर्यायाने तुमच्या आयुष्यावर याचा परिणाम होत असेल तर एक उपाय तुम्ही नक्की करु शकता. काय आहे हा उपाय माहित आहे? फळांचा राजा आंबा खाल्लात तर तुम्हाला या गोष्टी विसरण्याच्या समस्येपासून नक्कीच सुटका मिळू शकते. आंबा खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
स्मरणशक्ती वाढविण्याबरोबरच आंब्यामध्ये आणखीही बरेच गुणधर्म असून डोळ्यांचे सौंदर्य कायम राखण्यासाठीही आंबा उपयुक्त ठरतो. ज्या लोकांना गोष्टी विसरण्याचा आजार आहे त्यांनी आंबा जरुर खायला हवा. आंब्यामध्ये असणाऱ्या ग्लूटामिन अॅसिडमुळे स्मरणशक्ती वाढण्याबरोबरच रक्तपेशी सक्रीय होण्यास मदत होते. आंब्यामध्ये असणाऱ्या अ जीवनसत्त्वामुळे डोळ्यांची चमक वाढते. तसेच डोळे कोरडे होणे आणि रातांधळेपणापासूनही मुक्तता मिळते. ज्यांच्या शरीरात लोहाची कमतरता आहे त्यांच्यासाठीही आंबा खाणे अतिशय उपयुक्त ठरु शकते.
परंतु ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांनी मात्र आंबा खाणे टाळायलाच हवे. कारण आंब्यामध्ये क जीवनसत्व, पोटॅशिअम आणि कार्बोहायड्रेट हे पदार्थ असतात. जे मधुमेहींसाठी घातक ठरु शकतात. त्यामुळे आंब्याच्या सिझनमध्ये भरपूर आंबा खाऊन घ्यायला हवा. यावर्षी जे त्यापासून मुकले असतील त्यांनी पुढील वर्षी तरी आपली स्मरणशक्ती वाढविण्यासाठी जास्तीत जास्त आंबा खा.