नोकरीसाठी आपला “रेझ्युमे” असा असावा

You are currently viewing नोकरीसाठी आपला “रेझ्युमे” असा असावा

नोकरीसाठी अर्ज करताना सगळ्यात पहिल्यांदा पाठवला जातो तो म्हणजे “रेझ्युमे”. तुमचा रेझ्युमे हा तुमची शैक्षणिक पात्रता, कामाचा अनुभव आणि इतर गुणांकडे HR चं लक्ष वेधुन घेतो. पण वास्तविक पाहिले तर प्रत्येक पदासाठी शेकडो अर्जदार असतात. मग या अश्या अर्जदारांच्या गर्दीत, तुमचा रेझ्युमे जर उठुन दिसलाच नाही किंवा तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल पुरेशी माहिती देणारा नसेल, तर तुम्ही इंटरव्हियु साठी बोलावले जाणार नाही. कदाचित तुमची शैक्षणिक पात्रता व कामाचा अनुभव हा त्या पदासाठी योग्य असेल. परंतु रेझ्युमे चांगला नसल्यामुळे तुम्ही संधी गमवाल.

त्यामुळे तुमचा रेझ्युमे हा HR ला गोंधळात टाकनारा किंवा त्रुटींनी भरलेला असेल तर त्याकडे दुर्लक्ष केले जाते. आज इंटरनेट च्या युगात, एक प्रभावी रेझ्युमे असेल तर तुम्हाला नोकरीच्या विविध ऑफर येऊ शकतात. आपला रेझ्युमे चांगल्या पद्धतीने लिहण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स आहेत, त्या खालील प्रमाणे :

Smartelix-Steps-to-writing-perfect-resume

१. रेझ्युमेचा उद्देश जाणून घ्या: साधारणपणे एक रेझ्युमे ३० सेकंदांमध्ये स्कॅन केला जातो. जर तुमचा रेझ्युमे दोन पृष्ठांपेक्षा अधिक असल्यास तो समजून घ्यायला आणि वाचण्यास खूप वेळ जातो. त्यामुळे आपण कोण आहात आणि आपण काय करता याचा थोडक्यात आढावा देण्यासाठी करियर सारांश तयार करा. हा सारांश ज्या पदासाठी अर्ज करताय त्यास अनुसरुन असावा. Smartelix-free-email-service-providers

२. ऑफिशल ई-मेल पत्ता तयार करा: ई-मेल ID मध्ये तुमचे टोपणनाव, पाळीव प्राण्याचे नाव, आवडता विषय, संख्या, प्रतीके किंवा इतर कोणत्याही वैयक्तिक माहिती देणे टाळा. उदा. pinki१२४@gmail.com, lokesh४[email protected]. असे ई-मेल ID तुम्ही नोकरी प्रती उत्सुक नसल्याचे दाखवतात. तसेच शून्य आणि “O” अक्षर समान दिसत असल्याने असे ई-मेल ID गोंधळात टाकू शकतात. चुकीच्या ई-मेल पत्त्याचा वापर केल्याने 76% रेझ्युमे नाकारले जातात असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ई-मेल ID मधे आपले नाव आणि आडनाव वापरा. त्या नावाने ID असल्यास वडिलांचे / आईच्या नावाचे आद्याक्षर, वेगळ्या फ्री ई-मेल अकाऊंट वेबसाईट उदा. Yahoo, Gmail, Outlook, Aol वापरू शकता. याव्यतिरिक्त आपण ई-मेल वारंवार तपासा, म्हणजे आपण वेळेवर नियोक्ता चौकशीस प्रतिसाद देऊ शकता.

३. अद्ययावत संपर्क माहिती द्या: आज प्रत्येकजणांकडे एकापेक्षा जास्त मोबाईल नंबर आहेत आणि ते सारखे बदलत राहणारे पण आहेत. फोन नंबर हा नियोक्त्याने तुमच्या संपर्कात येण्याचा एक मार्ग आहे. त्यामुळे तुम्ही जर रेझ्युमे वर चुकीचा (किंवा जुना) फोन नंबर टाकला तर नियोक्ते तुमच्या संपर्कात राहू शकणार नाहीत. त्यामुळे आपण नोकरी च्या संधी गमावू शकतो.

४. उलट-कालानुक्रम वापरा: तुमच्या रेझ्युमेच्या शिक्षण विभागात प्रथम तुमची सर्वोच्च पदवी लिहा. अश्याच प्रकारे तुमच्या अनुभव विभागासाठी, तुमची वर्तमान नोकरी प्रथम ठेवा.

Smartelix-resume-shortlisting५. रेझ्युमे चा फॉन्ट: रेझ्युमे मधे फॉन्ट निवडणे व त्याचा आकार महत्त्वाचे आहे. चांगल्या फॉन्ट ने तुमचा रेझ्युमे हा प्रोफेशनल दिसतो. म्हणून रेझ्युमे बनवताना हे सुनिश्चित करा की कोणता फॉन्ट सर्वात योग्य आहे. जगात सर्रास ऑफिशल कामांसाठी वापरला जाणारा फॉन्ट म्हंजे “Times New Roman” किंवा “Arial”. तसेच तुमच्या फॉन्टचा आकार 10-12 पॉइंटमध्ये ठेवा जेणेकरून नोकरी देणारे व्यवस्थापक सहजपणे वाचू शकतील.

६. इंग्लिश ग्रॅमर: एकदा तुमचा रेझ्युमे बनवून झाला कि त्याच्यात स्पेल्लिंग व व्याकरण तपासून घ्या. अश्या चुका जर राहिल्या तर तुमच्या प्रोफेशनल असण्याबद्दल संभ्रम तय्यार होऊ शकतो.

७. रेझ्युमेच्या कॉपी चा फाईल फॉरमॅट: अनेकदा आपण MS-Word वापरुन रेझ्युमे बनवतो. परंतु कधीपण नोकरीसाठी रेझ्युमे पाठवताना तो PDF फॉरमॅट मधे जतन करून पाठवणे योग्य. PDF म्हणून तुमचा सारांश जतन करण्याचा लाभ हा आहे की उघडल्यानंतर त्याचे स्वरूप बदलणार नाही. तसेच फाईल ला आपले पूर्ण नाव द्यावे. उदा. Sohan Shinde Resume.pdf

८. तुमची ऑनलाइन उपस्थिती ठेवा: व्यवस्थापक ऑनलाईन देखील तुमचा शोध घेतात. त्यामुळे ऑनलाईन नोकरी च्या पोर्टल जसे नौकरी, टाइम्स जॉब्स, मॉन्स्टर जॉब्स, क्विकर यांवर आपले प्रोफाइल बनवून रेझ्युमे अपलोड करा. तसेच नेहमी तुमच्या लिंक्डइन प्रोफाइलला अपडेट करा, जेणेकरून ते तुम्हाला एखाद्या नवीन जॉब साठी रिस्पॉन्स देतील.

आपल्याला शिक्षण, नोकरी संदर्भात योग्य मार्गदर्शन करता यावे म्हणून आम्ही एक फेसबुक ग्रुप तय्यार केला आहे. ह्या ग्रुप ला कनेक्ट होण्यासाठी क्लिक करा स्मार्टएलिक्स करियर मार्गदर्शक (Smartelix Career Guidance).

Leave a Reply